चिपळूणमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाण पुलाचं काम सुरू असताना या उड्डाण पुलाचा गर्डर अचानक तुटला. सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली.