चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले बांधकाम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, या महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दरम्यान, बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटला.