Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (13:41 IST)
Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाने निरोप घेतला असून देखील काही भागात पावसाळी वातावरण दिसून येत आहे. सध्या ऑक्टोबरचा उन्हाळा जाणवत आहे. तर काही भागात हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील कोकणच्या भागात आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुसाट वारा वाहण्याची शक्यता असून मुंबईतील काही परिसरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातून मान्सून ने निरोप घेतला आहे. राज्यातील काहीभागात ऑक्टोबरच्या कडक उन्हाचा झळा जाणवत आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 35 अंश सेल्सिअसहून अधिक आहे. तर अकोल्यात काल राज्यातील उच्चांकी 37.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
जम्मू, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे, ज्याचा परिणाम सोमवार आणि मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये दिसून येईल.
या पावसामुळे येत्या पाच दिवसांत किमान तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसची घसरण दिसून येईल. दक्षिण तामिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.