Rain News : राज्याकडे पावसाने पाठ फिरवली

शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (19:03 IST)
सध्या पावसाळा सुरु आहे मात्र राज्यात मुंबई सह पावसाने पाठ फिरवली आहे. राज्यात 7 सप्टेंबर पर्यंत मुंबई आणि कोकणात आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण असण्याची  शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   
 
1 सप्टेंबर नंतर राजस्थानातून माघारी फिरणारा परतीचा पाऊस आणि बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वेकडे पावसाची शक्यता आहे. 
 
या वर्षी जून, जुलै , ऑगस्ट या महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.मात्र सप्टेंबर महिन्यांत पावसाची शक्यता वर्तव्यात आली असून शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे.  राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आगस्ट महिन्यांत राज्यात पाऊस झालेला नाही. आता सप्टेंबर महिन्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता पुणे वेधशाळ कडून वर्तवण्यात आली आहे. 
 
राज्यात जून जुलै आणि आगस्ट महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पाऊस नसल्यामुळे राज्यातील परिस्थिती भीषण आहे. शेतकऱ्यांच्या हातातून पीक निघून गेले आहे. शिंदे फडणवीस सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती