Pune : डीजेच्या लेझर बीममुळे पुण्यातील 15 नागरिकांच्या डोळ्यांना इजा

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (19:00 IST)
Pune : गणेश विसर्जन मोठा दणक्यात आणि उत्साहात करण्यात आले. गणेश विसर्जनाच्यावेळी डीजे सह लेझरबीम लावण्यात आले होते. या लेझर बीम किंवा किरणांमुळे 15 नागरिकांच्या डोळ्याला इजा झाल्याच्या घटना घडल्या आहे. डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाच्या डोळ्यावर लेझर बीम पडल्यामुळे काहींच्या डोळ्यात काळे डाग झाले तर काहींच्या डोळ्यावर भाजलेल्या जखमा झाल्या. 
 
तर एका तरुणाची 70 टक्के दृष्टी गमावल्याचे समजले आहे. हा तरुण विसर्जन मिरवणुकीत तीन तास नाचत होता नंतर त्याला अंधुक दिसू लागले. डॉक्टरांकडे गेल्यावर त्याच्या डोळ्याच्या दृष्टीवर या लेझर बीमचा परिणाम झाला असून 70 टक्के डोळ्याची दृष्टी अधू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी राज्य सरकारने लेझर बीमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

या लेझर बीमचा परिणाम तरुणांच्या दृष्टीवर पडतो. हे लेझर पाच मिलिव्हेट पेक्षा अधिक क्षमतेचे असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम दृष्टीवर पडतो. आणि दृष्टी अधू होते. असे डॉक्टरांनी सांगितले. आता या तरुणावर उपचार सुरु आहे. राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घ्यावा आणि लेझर बीमवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती