Pune: पुण्यात गणपती विसर्जनात जुन्या कारणांवरून दोन गटात हाणामारी

शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (13:19 IST)
Pune: 10 दिवसांचा गणेशोत्सवाचे समापन अनंत चतुर्दशीला  झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरा घरात स्थापित केल्यावर त्याला ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनाच्या वेळी भाविकांमध्ये उत्साह दाणगा असतो.

सार्वजनिक मंडळांच्या सोबत घरातील गणपतींना देखील निरोप देण्यात आला. या मध्ये या विसर्जनाच्या वेळी या उत्सवाला गालबोट लागले आहे.पुण्यात सहकार भागात गणेश विसर्जनाच्या वेळी दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. सहकारनगरात दोन गट आहे शेंडी आणि सूर्या नावाचे. या दोन्ही गटात काही जुन्या कारणांवरून वाद झाला. नंतर या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. या हाणामारीत दगड, लाठ्या, विटांचा वापर करण्यात आला.

त्यामुळे दोन्ही गटातील महिला, मुले जखमी झाले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यात हाणामारी झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले असून त्यांची पळापळ झाली. 
 
 


Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती