महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर कारवाईच्या मागणीवरील प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर बंद करावेत.
तसेच धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याची आणि नियमांचा पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक पोलिसांची असेल. कोणत्याही पोलीस ठाण्याच्या परिसरातून या बाबत तक्रार आल्यास तेथील पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट केले.
या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, लाऊडस्पीकराच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. स्थानिक पोलिस ठाण्याने परिसरात गस्त घालावी आणि अशा लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे. नियमांचा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.