सध्या मुलींवर आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण वाढत आहे. लव्ह जिहादवर कायदा आणण्याचा विचार सध्या सुरु आहे. या बाबतीत मध्यप्रदेशात लोकांचे धर्मांतरण करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार असा निर्णय मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. ते म्हणाले, धार्मिक स्वातंत्र्य कायद्याद्वारे आम्ही अशी तरतूद करत आहे. की जे लोक धर्मांतर करतात त्यांना आमचे सरकार फाशी देईल.
धार्मिक स्वातंत्र्य कायद्यात बदल करण्यासोबतच, आता धर्मांतर करणाऱ्यांना मृत्युदंडाची तरतूद असेल. या पावलामुळे राज्यातील धर्मांतराच्या घटनांवर कडक नजर ठेवली जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत धर्मांतर किंवा गैरवर्तनाला समाजात स्थान मिळणार नाही. या घृणास्पद कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांशी सरकार कठोरपणे वागेल.
त्यांनी अनेक महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रमाता पद्मावती पुरस्कार (2023), राजमाता विजयाराजे सिंधिया समाजसेवा पुरस्कार (2023-24), राणी अवंतीबाई वीरता पुरस्कार (2024) आणि श्री विष्णू कुमार महिला आणि बाल कल्याण समाजसेवा सन्मान पुरस्कार (2024) देऊन सन्मानित केले.