तसेच संजय राऊत म्हणाले, पुणे बलात्कार प्रकरणाचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले, “पुण्यातील घटनेबद्दल सर्वांना माहिती आहे. मंत्री असो, आमदार असो, नेता असो किंवा सत्ताधारी सरकारचा कोणताही नेता असो, जो महिलांना धमकावतो आणि ब्लॅकमेल करतो, सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मुली आणि बहिणींना पैसे देऊन चालणार नाही. सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “तुम्ही कायदे करता, पण कायदा कुठे आहे? पण महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यात कोणतेही बळ नाही. जर महिलांना खरोखरच सक्षम बनवायचे असेल तर ते फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देऊन शक्य होणार नाही. आपल्याला त्यांना त्यांचे हक्क द्यावे लागतील, तीच आपली ताकद असेल.” असे देखील ते यावेळी म्हणाले.