महिला कर्मचारी असलेले पहिले स्टेशन म्हणून माटुंगा स्थानकाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. तसेच दीर्घकाळापासून घर आणि ऑफिस चालवणाऱ्या महिला आज मुंबईला एका खास पद्धतीने चालवण्यास सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, अनेक स्थानकांवर 'सर्व महिला कर्मचाऱ्यां' द्वारे गाड्या चालवल्या जातील, तर काही ठिकाणी तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी महिला तैनात केल्या जातील. पश्चिम रेल्वेने चर्चगेट स्थानकावर एक विशेष महिला ब्रिगेड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे २५ महिला टीसींची एक टीम स्टेशनवर तिकीटविरहित प्रवासाची तपासणी करेल आणि लोकल ट्रेनमधील तिकिटांची देखील तपासणी करेल. अशी माहिती समोर आली आहे.