ओडिशात भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू

गुरूवार, 25 सप्टेंबर 2025 (20:48 IST)
ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात गुरुवारी एक दुःखद रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. कोइडा ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या बलांग पोलिस स्टेशन परिसरात एनएच-५२० महामार्गावर हा अपघात झाला. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, एक खाजगी बस राउरकेलाहून कोइडाकडे जात होती. बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.  
ALSO READ: १७ वर्षांनंतर न्याय मिळाला... मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून प्रसाद पुरोहित निर्दोष, कर्नलपदी बढती
मिळालेल्या माहितीनुसार बस चुकीच्या दिशेने येत होती, ज्यामुळे समोरून टक्कर झाली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.व  जखमींना बानेई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राउरकेलाचे पोलिस अधीक्षक म्हणाले, "प्राथमिक तपासानुसार, अपघाताच्या वेळी बस चुकीच्या दिशेने येत होती, ज्यामुळे ट्रकला समोरासमोर धडक झाली. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आठ हून अधिक जण जखमी आहे. चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये अंदाजे ४० लोक होते. 
ALSO READ: गोंदियात बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती