मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही तरुण त्यांच्या अॅक्टिव्हा स्कूटरवरून शिळफाटा येथे कामासाठी जात असताना कंटेनरला धडकले. तिघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे वय १८ ते २३ वर्षे असल्याचे वृत्त आहे.
अपघाताची बातमी मिळताच मुंब्रा पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. घटनेचा तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.