दोन दिवसांपूर्वी हिंदू जनजागृती समितीने माहिती अधिकाराद्वारे माहिती मागितली होती, ज्यामध्ये 2011 ते 2023पर्यंत औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीवर 6.5 लाख रुपये खर्च झाल्याचे उघड झाले.हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनी या प्रकरणावर सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे आणि कबर हटवण्याची मागणी केली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाची ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली होती. हे थडगे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत आहे. म्हणून, ते काढून टाकण्यासाठी किंवा कोणतेही बदल करण्यासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक असेल. त्यांनी सांगितले की, या संदर्भात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही.