योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, आज मिहानमध्ये 800 टन क्षमतेचा संत्र्याचा रस काढण्याचा कारखाना उभारला जात आहे. या रसात एक टक्काही पाणी आणि साखर नसेल. याशिवाय आपण तेल काढण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करू. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची पूर्ण किंमत मिळेल. देशातील लोकांना पिण्यासाठी चांगला रस मिळेल. या प्लांटच्या बांधकामाचा एकूण खर्च 1500 कोटी रुपये असेल. आम्ही यावर आधीच 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत.
रामदेव म्हणाले की, हा आशियातील सर्वात मोठा अन्न प्रक्रिया पार्क आहे. याआधी पतंजलीने हरिद्वारमध्ये आशियातील सर्वात मोठा फूड पार्क बांधला होता. आता, शेजारच्या राज्यांमधूनही संत्री या मिहान प्लांटमध्ये येतील. या प्लांटनंतर आणखी अनेक प्लांट उभारले जातील असा दावा रामदेव यांनी केला. एका अर्थाने, हे कृषी क्रांतीचे आवाहन असेल.पतंजली फूड पार्कमधून शेतकरी श्रीमंत होतील. असे रामदेव बाबा म्हणाले.