मुंबई उच्च न्यायालयाने कापूर उत्पादनामुळे पतंजलीला 4 कोटींचा दंड ठोठावला

मंगळवार, 30 जुलै 2024 (16:38 IST)
बाबा रामदेव यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सर्वोच्च न्यायालय नंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदाला 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.कंपनीला कापूर उत्पादन विकण्यापासून रोखण्यासाठीचे अंतरिम आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. 

पतंजली आयुर्वेदाच्या विरोधात ट्रेडमार्क उल्लंघनच्या दाव्यात मंगलम ऑरगॅनिक्सच्या अंतिम याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. 

मंगलम ऑरगॅनिक्सने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना गतवर्षी 30 ऑगस्ट रोजी न्यायालयाने पतंजलीला कापूर उत्पादने न विकण्याचे आदेश दिले होते. तरीही पतंजली कापूर उत्पादने विकत होते.  त्यानंतर मंगलम ऑरगॅनिक्सने न्यायालयात अंतरिम याचिका दाखल केली होती. या याचिकेत  पतंजलीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे सांगितले होते. 

मंगलम ऑरगॅनिक्सने दावा केला आहे की पतंजलीने 24 जूननंतरही उत्पादने विकली आहेत. त्यात पुढे म्हटले आहे की 8 जुलैपर्यंत कापूर उत्पादने फक्त पतंजलीच्या वेबसाइटवर विकली जात होती. पतंजलीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला नाही.

सुनावणीदरम्यान, न्यायालयाच्या निदर्शनास आले की पतंजलीने स्वतःच कबूल केले की बंदी आदेशानंतरही त्यांनी कापूर उत्पादने पुरवली. याशिवाय 24 जूननंतरही उत्पादनांची विक्री झाली.  

त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीला आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी 50 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले. तसेच मंगलम ऑरगॅनिक्सला पतंजलीने केलेल्या उल्लंघनाची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोमवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने पतंजलीला आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आणखी चार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले.  
Edited By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती