मुखर्जी यांनी परदेशात जाण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या याचिकावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. इंद्राणी मुखर्जींना 10 दिवसांसाठी मालमत्ता आणि बँक खात्याशी संबंधित कामांना पूर्ण करण्यासाठी युरोपला जाण्याची परवानगी द्यावी अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.
विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार, इंद्राणी मुखर्जी कोर्टात रोख सुरक्षा म्हणून 2 लाख रुपये जमा केल्यावर पुढील तीन महिन्यांत न्यायालयाच्या सुनावणीच्या दोन तारखांमधील 10 दिवसांचा प्रवास करू शकतात. तसेच त्यांच्या दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती सीबीआयला द्यावी लागणार आहे.