याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या याचिकेत केली आहे. याचिकेत गोगावले यांनी म्हटले आहे की, 'निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले असेल, तर आम्हीच खरी शिवसेना आहोत. दुसरी शिवसेना नाही.