LIVE: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा उद्रेक,225 रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू

रविवार, 9 मार्च 2025 (10:40 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे अधिक रुग्ण आढळल्याने, संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यापैकी आतापर्यंत 197प्रकरणांची पुष्टी झाली आहे. तर 28 जण सध्या संशयित आहेत. या आजारामुळे आतापर्यंत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर सहा मृत्यू अजूनही संशयास्पद आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती