वाचा, चंद्रकांत पाटील यांचा नवा गौप्यस्फोट

शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (15:06 IST)
कालचक्र नेहमी फिरत असतं. ते नेहमी वर जातं, खाली येतं. खाली जातं, वर येतं. आता महाराष्ट्रात तुम्ही आहात. केंद्रात आम्ही आहोत. महाराष्ट्रात आम्ही वर होतो, खाली आलो. कुणालाही अंदाज नाही. साडेसातशे कोटीचा मानवी समाज आहे. हे ठरलेलं असतं. बी प्रॅक्टिकल व्हा. 2014 ते 2019मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा  प्रयोग तीन वेळा करण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धनजींना माहीत आहे. पण त्यावेळी का नाही जमला? तर तेव्हा व्हायचं नव्हतं. आता का जमलं? तर आता व्हायचं होतं, गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी केला.  चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला.
 
आम्ही 120 / 130 क्रॉस केला नाही हे दुर्दैव. थोडे कमी जास्त असते तरी अपक्षांना सोबत घेतलं असतं. मात्र जागा कमी आल्या तर भाजपला सोबत घ्यायचं नाही हे आधीच ठरलं होतं. संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली. 2014 ते 2019 या काळात तीन वेळा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. एकदा तर अर्थसंकल्पी अधिवेशनात प्रयत्न झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तो यशस्वी झाला नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती