राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे पुन्हा आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढून परभणी, नाशिक,ठाणे,रायगड,कोकण पट्टा,पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.याच बरोबर मराठवाड्यासह विदर्भ भागात देखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या मेघसरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रा मध्ये चांगल्या पावसाची शक्यता देखील यापूर्वी हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली आहे.