सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स अलवलीद बिन खालेद यांचे शनिवारी निधन झाले. क्राउन प्रिन्स अलवलीद गेल्या 20 वर्षांपासून कोमात होते. त्यामुळे अलवलीद बिन खालेद यांना स्लीपिंग प्रिन्स म्हणूनही ओळखले जात असे. 2005 मध्ये लंडनमध्ये एका कार अपघातात अलवलीद बिन खालेद गंभीर जखमी झाले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अलवलीद कोमात गेले.
त्यांच्या कुटुंबाने याची पुष्टी केली आहे. वयाच्या 15 व्या वर्षी कोमात गेलेले प्रिन्स अलवालीद यांनी कोमातच जगाचा निरोप घेतला. क्राउन प्रिन्सच्या निधनाबद्दल त्यांच्या वडिलांनी एक निवेदन जारी केले की, 'गहन दुःखाने आणि देवाच्या इच्छेवर आणि त्याच्या आदेशावर विश्वास ठेवणाऱ्या अंतःकरणाने, आम्ही आमचा प्रिय मुलगा, प्रिन्स अल-वालीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्यावर शोक व्यक्त करतो, ज्यांचे आज निधन झाले.'
प्रिन्स अलवलीद 15 वर्षांचे होते, तेव्हा लंडनमधील एका लष्करी महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा कार अपघात झाला . या अपघातात प्रिन्सच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि ते कोमात गेले. नंतर, प्रिन्सला रियाधमधील किंग अब्दुल अजीज मेडिकल सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे ते 20 वर्षे वैद्यकीय मदतीवर होते.
या काळात, त्यांच्या शरीरात एक-दोनदा हालचाल दिसून आली, परंतु जगभरातील तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरही प्रिन्स कोमातून बाहेर येऊ शकले नाहीत.आणि आज त्यांचे निधन झाले. प्रिन्स अलवलीद बिन खालेद हे तीन भावांपैकी मोठे होते.