मिळालेल्या माहितीनुसार,सोनेगाव तलावाच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नितीन गडकरी सोनेगाव येथे गेले होते.कार्यक्रम संपल्यानंतर गडकरींच्या सात गाड्यांचा ताफा रात्रीच्या वेळी त्यांच्या निवासस्थानाकडे निघाला.छत्रपती चौकातील सिग्नलवर लाल दिवा लागताच ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावले. ताफ्यातील नंबर एक वाहन ट्रकला धडकले. यामुळे वाहनाचा पुढील भाग चक्काचूर झाला. पण सुदैवाने या अपघातात कारमध्ये बसलेले सर्व लोक सुखरूप बचावले.
जेव्हा कार ट्रकशी धडकली तेव्हा मोठा स्फोट झाला. बाहेरची लोक गाडीच्या दिशेने पळाले आणि गडकरींचे सुरक्षा रक्षक आधीच्या गाड्यांमधून खाली उतरले आणि धावले.पण सुदैवाने,अपघातग्रस्त कारमधील प्रत्येकजण सुरक्षित असल्याचे दिसले. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघाताचा आढावा घेतला आणि ते आपल्या घराकडे रवाना झाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस छत्रपती चौकात पोहोचले.आणि अपघातानंतर कारवाई सुरू झाली.