मनोज जरांगेच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला

Webdunia
रविवार, 21 सप्टेंबर 2025 (15:35 IST)
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते  मनोज जरंगे पाटील यांची आज 21 सप्टेंबर रविवारी रोजी अंतरवालीतील सरपंचाच्या शेतात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील आरक्षण चळवळीच्या पुढील दिशा आणि आगामी आंदोलनाची रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक ठेवण्यात आली.
ALSO READ: महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपुरात होणार नाही
या बैठकीसाठी सकाळपासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समन्वय आणि गावोगावातील प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. मात्र या बैठकीपूर्वी अचानक मधमाश्यांनी हल्ला केला.लोकांनी बचावासाठी पळापळ सुरूकेली. मात्र या हल्ल्यात मधमाश्यांनी अनेकांना चावलं. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
ALSO READ: खाजगी कंपन्या देखील ओसाड आदिवासी जमीन भाड्याने देऊ शकतात फडणवीस सरकार कायदा आणणार
लोकांनी मधमाश्यापासून मनोज जरांगे यांना वाचवण्यासाठी त्यांच्या अंगावर उपरणे टाकून त्यांना सुरक्षितस्थळी नेले. काही वेळानंतर परिस्थतीत सुधारणा आल्यावर पुन्हा बैठक सुरु करण्यात आली. 
ALSO READ: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना धक्का, इतक्या महिलांची नावे वगळली
या बैठकीत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील मुद्द्यांविषयी माहिती दिली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातील 50 ते 60 तालुका सेवकांना बोलावले होते. तसेच गाव, तालुका, जिल्ह्यस्तरावर नोंदी शोधणारे बांधव, प्रमाणपत्र काढणारे, दस्तऐवज मांडणारे, मराठा समाजासाठी काम करणारे सेवकांना देखील सहभागी करण्यात आले.
  Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

पुढील लेख