बच्चू कडू : 'नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोजीचा प्रश्न मिटला असता'

Webdunia
रविवार, 29 मे 2022 (10:05 IST)
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
 
"गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता," असं वक्तव्य कडू यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
 
बुलडाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना कडू म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किंमती आणि गॅसच्या किंमती सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढवत आहेत.
 
"महागाईने कहर केला आहे. मोदी पंतप्रधान झाले आणि मंदिर-मशीदचा प्रश्न मिटला. पण जर नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर देशाच्या रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता. गडकरी हे चांगले व्यक्ती आहेत."

संबंधित माहिती

पुढील लेख