लढत रंगणार; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार देणार भाजपने केले 'या' नावावर शिक्कमोर्तब

शनिवार, 28 मे 2022 (21:51 IST)
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने अतिरिक्त उमेदवार दिला असून भाजपने देखील ही जागा लढण्याची तयारी केली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने बैठक घेतली असून यामध्ये भाजप नेते धनंजय महाडिक  यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर येते आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना व भाजप लढत रंगणार यात शंका नाही.
 
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. विविध पक्षाच्या बलानुसार भाजपचे दोन, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा 1 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. व उर्वरीत एका जागेसाठी शिवसेनेने एक उमेदवार घोषित केला आहे. या जागेसाठी संभाजीराजे भोसले उत्सुक होते. परंतु, शिवसेनेते प्रवेश नाकारल्याने शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली. शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता भाजपनेही सहाव्या जागेसाठी निवडणुक लढण्यासाठी कंबर कसली आहे.
 
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आज आज भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले आहे. याची लवकच अधिकृत घोषणाही करण्यात येणार असल्याचे समजत आहे. यामुळे राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
 
तर, भाजपचे विधानसभेतील संख्याबळ पाहता दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर लढवेल अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी लढवेल आणि जिंकेलही, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार भाजपने आता तिसरा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती