अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी चर्चा सुरु आहे. यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
“दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे,” अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक सही संतापाची या मोहिमेचं दहिसर येथे आयोजन केलं होते. तेव्हा अमित ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अमित ठाकरे म्हणाले, “मला वाटतं, दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे. ते म्हणजे राज ठाकरे… आम्ही या राजकीय चिखलात नाही. त्यामुळे मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. राज ठाकरेंनी आम्हाला येथेपर्यंत पोहचवलं आहे. यापुढील निर्णयही राज ठाकरेच घेतील.”