सावंतवाडी : मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना जास्त महत्त्व देऊ नका. आम्ही येथील जनतेला महत्त्व देतो. ज्यांना महत्त्व नाही त्यांच्याविषयी काय बोलायचं अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हे 50 खोके वाले गद्दार आहेत . हिम्मत असेल तर या गद्दार सरकारने निवडणुकीला सामोरे जावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीत चिताराळीचा राजा गणेशोत्सवाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सागर नाणोसकर, अशोक गुप्ता ,एडवोकेट राघवेंद्र नार्वेक,र देवराज सुराणा शब्बीर मणियार, सतीश नार्वेकर ,शैलेश गवंढळकर, रेशमी माळवदे ,सुरेश भोगटे, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.