Palghar News: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात एका कार चालकाने पाच वर्षांच्या चुमुरड्यावर कार चढवली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुधवारी ही घटना घडली असून मुलगा चमत्कारिकरित्या वाचला पण त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
एका मिनिटाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वळण घेत असताना प्रवाशानी भरलेली कॅब एका मुलाला चिरडत असल्याचे दिसून येते. आश्चर्याची बाब म्हणजे, अपघातानंतर मूल स्वतःहून उभे राहून घरी निघून गेले, तर शेजारी उपस्थित असलेली इतर मुले त्याच्याकडे धावत आली. सध्या बालकाला वालीव येथील वालदेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला, डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहे.