नाशिक येथे बसला आग लागून 8 जणांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (08:22 IST)
नाशिकमध्ये काल रात्री एका खासगी बसला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.
 
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर एकूण मृतांचा आकडा समोर येईल, असंही ते म्हणालेत.
 
एबीपी माझाच्या बातमीनुसार, नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा अपघात झाला आहे. यवतमाळहून मुंबईकडे ही खासगी बस चालली होती. दरम्यान या बसला आग लागली.
 
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

पुढील लेख