महाविकास आघाडी सरकारशी संबंधित राजकीय नेत्यांचे बेकायदा 'फोन टॅपिंग' केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
रश्मी शुक्ला यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या टोळीवर कारवाई करण्याचे कारण दाखवून गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची कोणतीही परवानगी न घेता राजकीय नेत्यांचे 'फोन टॅप' केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.