मृद व जलसंधारण विभागांतर्गत 670 पदांची भरती होणार -संजय राठोड

मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (11:22 IST)
राज्यात मृद व जल संधारण विभागांतर्गत  राज्य आणि जिल्हा परिषद स्तरावर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्याची माहिती मृद  जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली असून या पदांसाठी सेवा प्रवेश नियम अधिसूचित केले आहे. या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबादचे असणार. यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या पदांच्या भरतीसाठी टीसीएस कंपनीसह करारनामा केला आहे. 

या पदांसाठी भरतीची जाहिरात अभ्यासक्रमाला मान्यता देत परीक्षेसाठीची वेळ निश्चित केली जाईल .परीक्षा 200 गुणांची असून विषय मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी स्थापत्य अभियांत्रिकी असतील .
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती