मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्यामुळे खळबळ उडाली. हे ड्रग्स समुद्राच्या लाटांनी तरंगणा-या पॅकेट्सच्या स्वरूपात किना-यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील ७ वेगवेगळ््या किना-यांवरून सीमाशुल्क विभागाने २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले. ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान राज्याच्या वेगवेगळ््या किना-यांवर वाहून आले. कर्डे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बोर्या समुद्रकिना-यांवर ही ड्रग्सची पाकिटे जप्त करण्यात आली. ही पॉकिटे अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून आली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ््या समुद्रकिना-यांवर वाहून आलेली ड्रग्सची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, असा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. ही अंमली पदार्थांची पाकिटे एक तर समुद्रात पडली असतील किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उद्देशाने परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशयही सीमाशुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे.