10 मोरांचे मृतदेह आढळून आले

Webdunia
शनिवार, 28 मे 2022 (16:30 IST)
Nashik Peacock Death :नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka)आमोदे येथील शिवारात दहा मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे वन विभागात (Forest Department)खळबळ उडाली आहे. वन विभागाने या दहाही मोरांच्या मृत्यूची नोंद घेतली असून, विषबाधेमुळे या मोरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
ही घटना नांदगाव ते गिरणा तालुक्यातील आमोद शिवार व मन्याड नदीच्या आसपासची आहे. दीपक पगार हे शेतात जात असताना त्यांना विठ्ठललाला पगार यांच्या शेतात काही मोर दिसले. त्यांनी तत्काळ यासंदर्भात वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता सुमारे दहा मोर मृतावस्थेत आढळून आले.

संबंधित माहिती

पुढील लेख