झाडे आणि वनस्पतींनी घर सजवल्याने मनाला शांती मिळते. तसेच घरात सकारात्मक उर्जा राहते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तु नियमानुसार झाडे लावली तर सकारात्मकतेसोबतच घरात धनाच्या आगमनाचे मार्गही खुले होतात. वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे. येथूनच घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. मेन गेटकडेच थोडंसं लक्ष दिलं तर लक्ष्मीला तुमच्या घरात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला जाणून घेऊया घराच्या मुख्य गेटवर कोणती झाडे लावावीत, त्यामुळे धनाची आवक वाढते.
घराच्या मुख्य गेटवर ही रोपे लावा
मनी प्लांट- वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या आत किंवा घराबाहेर कुठेही मनी प्लांट लावा, यामुळे घरात आनंदच वाढतो. घरामध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनी प्लांटची वेल लावा. मग बघा तुमचा इनफ्लो कसा वाढतो.