पुण्यातील ससून हॉस्पिटमध्ये एका बेडवर तीन रुग्ण

शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (18:04 IST)
मागील काही काळापासून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अधिकच गंभीर होत आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होतं आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून अनेक रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. काही रुग्णालयाच्या बाहेर बेडची वाट बघत आहे तर काही जमिनीवर उपचार घेत आहेत. दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात कॅज्युअल्टी वार्डमध्ये चक्क एका बेडवर तीन रुग्णांवर उपचार होत आहे.
 
पुरेशी जागा नसल्यामुळे हे दृश्य समोर येत आहे ज्यात एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावा लागत आहेत. येथील कॅज्युअल्टी वॉर्डची रुग्ण क्षमता 40 एवढी असताना दररोज 60 नवीन कोरोना रुग्ण येत आहेत. 
 
पुण्यातील ससून रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे देखील रुग्णांची हेळसांड होत आहे. येथील स्टॉफला ताण येत आहे. पुणे शहर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याच्या पहिल्या काही शहरांपैकी एक आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती