पुण्यातील पेठांमधील 5 मशीद ट्रस्टनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात सामाजिक संदेश देण्यासाठी तसेच फुकट पैशांची उधळपट्टी होऊ नये म्हणून काही महत्वाचा निर्णय घेतला आहे, असं माजी नगरसेवक युसूफ शेख यांनी सांगितलं. लोहियानगर परिसरातील पाच मशिदींची एक कोअर कमिटी तयार केली आणि त्यांच्या इमाम आणि कार्यकर्त्याची समुदायातील इतर वरिष्ठ सदस्यांसह बैठक घेतली आणि ईदच्या उत्सवादरम्यान डीजे न लावण्याचा निर्णय घेतला अशी माहिती शेख यांनी दिली.
भारतीय अंजुमन दारुस सलाम, खतीजा मस्जिद, अजिना मस्जिद आणि मोहंमदिया मस्जिद या पाचही मशीद ट्रस्टने ईदच्या दिवशी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवादरम्यान डीजे म्युझिक सिस्टीम खरेदी करण्यासाठी जमा होणारा निधी परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल, असेही ते म्हणाले.