रस्त्याच्या कडेला झोपणं महागात पडलं! अंगावरुन कार गेल्याने एकाचा मृत्यू

बुधवार, 27 एप्रिल 2022 (21:12 IST)
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या  कडेला झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा अंगावरुन भरधाव वेगातील कार गेल्यानं जागीच मृत्यू झाला आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मार्केटयार्ड परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
 
गेल्या 20 एप्रिलला दुपारी ही घटना घडली आहे. कार चालकाने हलगर्जीपणाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर घातली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसंच अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला.
 
दरम्यान, मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी किया सेल्टास कार एम.एच. 12 एस. क्यू. 9425 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती