आजोबांनी नातीचे जंगी स्वागत केले, नातीला आणायला हेलिकॉप्टर !

बुधवार, 27 एप्रिल 2022 (11:42 IST)
आजच्या आधुनिक काळात जिथे आजही घराण्याला वंशांचा दिवा हवा. असे म्हणणारे लोक आहे. आज ही  मुलासाठी मुलीला जन्मू देत नाही. अशा काळात काही जण मुलीच्या जन्माला मोठा सण -समारंभ म्हणून साजरा करतात. पुण्याच्या बालेवाडी परिसरात राहणाऱ्या बालवडकर  कुटुंबाने त्यांना कन्या रत्न झाल्यावर तिचे जंगी स्वागत केले. आज ही  घरात मुलगी झाली की  लोकांना दुःख होतो. पण बालवाडीतील राहणारे शेतकरी अजित पांडुरंग बालवडकर  यांना  नातं झाली. त्यांची सून अक्षता हिला कन्यारत्न झाली. तिच्या जॅल्मचा अक्षताच्या  सासऱ्यांना  इतका आनंद झाला की  त्यांनी चक्क आपल्या सुनेला आणि नातीला सासरी परत आणण्यासाठी कष्टाच्या माहेरी मांजरी फार्म शेवाळवाडी येथे त्यांना आणायला हेलिकॉप्टर पाठवले. एवढेच नवे ते हेलिकॉप्टरच्या लेन्डिंग साठी बालेवाडीतल्या पाटील वस्तीत खास हेलिपॅड बनवले. बालेवाडी येथे सून आणि नातं आल्यावर त्यांनी वाजत गाजत फुलं आणि पाकळ्यांची उधळण करत चिमुकलीचे स्वागत केले. त्यांनी या मुलीचे नाव क्रिशिका असे ठेवले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती