प्रकरण असे आहे की पुण्याच्या नानापेठपरिसरात या दुचाकीस्वराची गाडी नो पार्किंग मध्ये परिसरात उभी होती.हे नो पार्किंग झोन वाहतूक विभागाकडून तयार केले जातात.जेणे करून वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये.आणि या नो पार्किंग झोन मध्ये कोणी गाडी उभी केली,तर त्यांच्या कडून दंड आकारण्यात येतो.आणि वाहन टोईंग व्हॅन मधून उचलण्यात येतं .पण पुण्यात वाहुतक पोलिसांनी चक्क वाहनासह मालकाला देखील उचलण्याची धक्कादायक घटना घडली आहे .या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
या वर स्पष्टीकरण देत वाहतूक पोलिसांनी सांगितले की या दुचाकीस्वाराची दुचाकी नो पार्किंग झोन मध्ये होती, म्हणून कारवाई करण्यात आली.परंतु वाहतूक पोलिसांनी वाहनासकट चालकाला उचलून टोईंग व्हॅन मध्ये गाडी ठेवण्याच्या अशा पद्धतीने कारवाई करणे कितपत योग्य आहे. जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि डोक्याला मार लागला असता तर त्याला जबाबदार कोण असणार ?असा प्रश्न उद्भवत आहे.