रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळून एकाचा मृत्यू

शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (08:59 IST)
पुण्यातल्या कात्रज परिसरात ओढ्याचे काम सुरू असताना त्याठिकाणी रस्ता दोन्ही बाजूने वाहतूकीसाठी खुला ठेवत तेथे उपाययोजना न केल्याने खड्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे.खंडू पुजारी (वय 24, रा. सुखसागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, महादेव सुर्यवंशी (वय 25) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व कंपनीचे इंजिनीअर सचिन कुरणे, शैलेश जाधव व लापसिंग यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत महादेव सुर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे.
 
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,कात्रज भागातील सुखसागरनगर ग.नं. 31 अंतर्गत पालिकेकडून ठेकेदाराला रोड ओढ्याचे काम देण्यात आले आहे.पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हे काम केले जात आहे. यादरम्यान हे काम करत असताना सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता दोन्ही बाजूने रोड वाहतूकीसाठी खुला ठेवला.तसेच, त्यांच्या निष्काळजीपणामुळे खंडु पुजारी यांच्या दुचाकीचा या खड्यामुळे अपघात होऊन ते यात गंभीर जखमी झाले.यात दोघेही जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरू असताना खंडू पुजारी यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक थोरात हे करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती