पुण्यात पाच रुग्णालयांत 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरु होणार

शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (08:31 IST)
पुणे जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. पण, कोरोनामुक्तीनंतरही रुग्णानी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. याचसाठी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय व नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरु करण्यात येणार आहेत. ही माहिती उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोविड आजारातून बरे झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्यांना औषधोपचार व समुपदेशन देण्याच्या दृष्टीने 'पोस्ट कोविड ओपीडी' लवकर सुरु होणे आवश्यक आहे. शहरातील ५ रुग्णालयात ही ओपीडी सुरु झाल्यानंतर अन्य रुग्णालये व ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने ही सुविधा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून कोविड रुग्णांवर उपचार करताना आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही पालन करावे. असे अजित पवार यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती