हो मी सिरमची लस घेतली, पण ............

शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (08:30 IST)
मी घेतलेली लस कोरोनाची नाही असं म्हणत सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लसीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही कोरोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असं सिरमकडून सांगण्यात आल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये खासगी असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही कोरोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती