5 हजार शहाळ्यांमध्ये 'दगडूशेठ' गणपती बाप्पा विराजमान

सोमवार, 16 मे 2022 (14:16 IST)
वैशाखच्या वणव्यापासून भारतीयांचे रक्षण व्हावे, शेतकऱ्यांचे समस्या दूर होण्याबाबत भारतात आरोग्य संपन्नता यावी दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष बेरोजगारी दूर व्हावी आरोग्य संपन्न भारत व्हावे या साठी प्रार्थना करत पुष्टीपती विनायक जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शहाळे महोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाना  5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. 
 
श्रीमंत  दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. सोमवारी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्म आणि पूजा , अभिषेक,गणेश याग करण्यात आला. शिव -पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेला दुर्मति राक्षसाच्या वधासाठी गणपती बाप्पाच्या या अवताराचा जन्म झाला.श्रीगणेश पुराण आणि मुद्गल पुराणात गणपती बाप्पांच्या या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारात भगवान विष्णूंच्या घरी पुष्टी म्हणून एक कन्या रत्न जन्माला येते. आणि श्री गणेश हे विनायकाच्या स्वरूपात शंकर -पार्वतीच्या घरी जन्म घेतात.

त्यावेळी दुर्मति राक्षसाच्या अत्याचाराने पृथ्वी -पाताळलोक आणि स्वर्गलोक हादरले आसते. त्याचा वध करण्यासाठी आणि त्याच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान गणेश हे विनायक अवतारात जन्म घेऊन दुर्मति राक्षसाचे अंत करतात. त्या मुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती  विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेच्या शुभ आणि पवित्रदिनी श्री गणेशाचा पुष्टीपती विनायक अवतार जन्माला आला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या शुभदिनी मंदिराची गाभाऱ्यासह शहाळ्यांसह वृक्षांची आरास करण्यात आली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती