अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा 'शरद पवारांना' उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला आहे. (Ketaki Chitale Facebook Post in Pawar)केतकी चितळेने यावेळी अत्यंत अनादरकारक भाषेत लिखाण केलेलं आहे.
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
दरम्यान, या पोस्टवरती सोशल मीडियावर आलेल्या कमेंटवर नजर टाकली असता, "केतकी ताई आपली लायकी आहे का बोलायची. पवारसाहेब कुठे आपण कुठं परत गुन्हा दाखल झाला की, रडू नका..." असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, "तिच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. कारण नाव कुठं घेतलंय यात. कविता लिहिनाराच वकील आहे." असं यामध्ये म्हटलं आहे.