पुण्यात सुटीच्या दिवशी सिंहगड बंद आंदोलन, पर्यटकांना फटका

रविवार, 15 मे 2022 (15:53 IST)
सध्या देशात सर्वत्र उकाडा सुरु आहे .त्यात मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या देखील सुरु असताना  पुण्यात महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार म्हणवला जाणाऱ्या सिंहगड किल्ल्यावर पर्यटक शनिवार आणि रविवारची सुट्टीचा बेत आखून फिरायला येतात. मात्र आज पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला बंद असून किल्ल्याच्या पायथा परिसरात आज बंद आंदोलन सुरु आहे. पीएमपीएमएल आणि वनविभागाच्या ई-बस च्या भोंगळ कारभाराच्या विरोधात सिंहगड बंद ठेवण्यात आला आहे. हे आंदोलन राजे शिवराय प्रतिष्ठान कडून करण्यात येतं आहे. नागरिक मोठ्या संख्येत या आंदोलनात उपस्थित झाले आहे. हे येणाऱ्या पर्यटकांची होणारी गैरसोय आणि घाटात होणाऱ्या अपघातांवर आळा बसावा या साठी राजे शिवराय प्रतिष्ठान हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांना फटका बसत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती