पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब?

शुक्रवार, 13 मे 2022 (12:54 IST)
पुणे रेल्वे स्टेशनवर अज्ञात व्यक्तीने ठेवलेली बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आहे. त्यामुळे खबरदारीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2  वर वाहतूक थांबवण्यात आली आहे आणि दोन्ही फलाटं रिकामी करण्यात आली आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
 
 सध्या पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली जात आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली शोध मोहीम सुरु आहे. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक याठिकाणी हजर आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सकाळी साडेदहा वाजता रेल्वे स्थानकावर स्फोटकसदृश वस्तू आढळून आल्या. प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु आहे. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती