पुण्यात प्रेयसीकडून भाजी चिरण्याच्या चाकूने बॉयफ्रेंडची हत्या

सोमवार, 29 मे 2023 (15:59 IST)
Pune Crime News पुण्यातील वाघोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे  परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 
माहितीनुसार यशवंत महेश मुंडे (20) असे मृत झालेल्या प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीचे नाव अनुजा महेश पणाळे असे आहे. किरकोळ वादातून हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रेमी जोडपं काही दिवसांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत रहात होते. मात्र पहाटे प्रियकराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. प्रथमदर्शनी प्रेयसीने घरात भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकरावर वार केल्याचे समजते. प्रियकराला रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत प्रेयसीही जखमी झाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र वादाचे नमके कारण काय ये अद्याप समजू शकले नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती