रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन गट अमोरसमोर आले असून त्यांच्यात हाणामारी होत आहे. त्यात एका तरुणाच्या हातात कोयता असून तो काहींवर सपासप वार करत आहे. लोंकाची गर्दी दिसत असून घडलेल्या प्रकारामुळे लोकांचा गोंधळ उडाला आहे. आपला जीव वाचविण्यासाठी लोकांची पळापळ सुरु आहे. अद्याप या घटनेची नोंद पोलिसात झालेली नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उदभवला आहे. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.