अरे देवा! मांजर समजून संगोपन केले आणि निघाला बिबट्या

शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (19:09 IST)
कधी कधी आपण करतो काही आणि घडत भलतंच. पुणे येथे देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. मांजर समजून बिबट्याच्या पिल्लाला पाळले.पिल्लूचे नाव 'चुटकी' ठेवले .या पिल्लुची अवस्था मरणासन्न होती. पिल्लूला दररोज दूध -ब्रेड पोळी असे खायला दिल्यामुळे त्याचे पोट बिघडले .केसांची गळती सुरु झाली. काही दिवसातच मालकाला हे पिल्लू मांजरीचे नसून बिबट्याचे असल्याचे लक्षात आले. पिल्लूचे हिमोग्लोबिन कमी झाले. तिची अवस्था मरणासन्न झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉटरांनी चुटकीला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याला बुटकी नावाच्या एका बिबट्याच्या पिल्लाने रक्तदान करून नवजीवन दिले.आता चुटकीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बिबट्याचे हे पिल्लू पुण्यात वनविभागाच्या संरक्षणात आहे. 

नाशिकच्या वनविभागा आणि इको इको या संस्थेने ने जून महिन्यात आपल्या ताब्यात घेतले त्यावेळी पिल्लुची तब्बेत खालावली असून त्याला रक्ताची गरज होती. संस्थेत आईपासून वेगळे झालेले एक बिबट्याचे धडधाकट पिल्लूने रक्त देऊन चुटकीचा जीव वाचविला. चुटकी आणि बुटकी नावाचे हे बिबट्याचे पिल्लू  ठणठणीत असून एकमेकांशी खेळतात .
Edited  By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती