टॉयलेटमधून नवजात बाळाला फेकले

मंगळवार, 18 एप्रिल 2023 (17:41 IST)
सिंहगड रोडवरील नवले हॉस्पिटलमध्ये एक अविवाहित मुलगी उपचारासाठी आली होती.त्यानंतर रुग्णाच्या शौचालयात तिने बाळाला जन्म दिला. तिने या बाळाला बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकले. यामध्ये बाळाची मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  
  
ही घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजता नर्हे येथील श्री काशीबाई नवले हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्डजवळील रुग्णांच्या बाथरूममध्ये घडली.
 
याप्रकरणी नंदा ढवळे (वय 62, नि. बाणेर) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या 19  वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
 
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी19 वर्षीय तरुणी मानाजीनगर येथील वसतिगृहात राहत असून  शारीरिक संबंधांमुळे ती 8 महिन्यांची गर्भवती होती. ही गोष्ट तिने  सर्वांपासून लपवून ठेवली.  जेव्हा तिच्या पोटात दुखू लागले तेव्हा ती  नवले रुग्णालयात आली आणि पाठदुखी व अशक्तपणाची तक्रार केली. पण ती 8 महिन्यांची गरोदर असल्याचे तिने लपवून ठेवले.
 
यानंतर ती रुग्णालयाच्या कॅज्युल्टी वॉर्डजवळील रुग्णाच्या शौचालयात गेली. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. तिने लगेच नवजात बाळाला टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले.
यामुळे बाळाचा मृत्यू झाला. या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आले असून तिच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती